ऋण वसुली न्यायाधिकरणाकडून (डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल) आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयात २३० खटल्यांमध्ये तडजोड करुन निकाली काढण्यात आले. तडतोडीत ६०४ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली.ऋण वसुली न्यायाधिकरण, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच ऋण वसुली न्यायाधिकरण वकील संघटनेकडून (डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल बार असोसिएशन) लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. लोकन्यायालयाचे उद्घाटन ऋण वसुली अपिलीय न्यायाधिकरण मुंबईचे अध्यक्ष, केरळ उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अशोक मेनन, पुणे ऋण वसुली न्यायाधिकरणाचे पीठासीन न्यायाधीश, निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>पुणे: सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळणाऱ्या अल्पवयीन मुलींशी लगट करणाऱ्या सुरक्षारक्षकाला अटक

लोकन्यायालयामध्ये एक हजार ३८ खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी २३० खटले तडजोडीत मिटवण्यात आले. तडजोडीतून बँकाची एकूण ६०४ कोटी रूपयांची कर्ज वसुली करण्यात आली. त्यापैकी एक खटल्यामध्येच १४९ कोटी रुपयांची वसुली झाली आहे, अशी माहिती अशी माहिती ऋण वसुली न्यायाधिकरणाचे प्रबंधक एस. एम. अबूज यांनी दिली.

हेही वाचा >>>पुणे: महापालिकेतील लोकशाही दिन केवळ उपचारापुरता

लोकन्यायालयात न्यायधीशांचे पाच पॅनेल तयार करण्यात आले. पॅनेल प्रमुख म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. जे. काळे, एस. बी. जगताप, डी. डी. कांबळे, अभय पटनी आणि करण चंद्रनारायण यांनी काम पाहिले. पॅनेल सभासद म्हणून ॲड. नारायण खामकर, ॲड. विजय राऊत, ॲड. स्मिता घोडके, ॲड. श्रृती किराड, ॲड. रेश्मा माळवदे, ॲड प्रियंका मानकर यांनी काम पाहिले. लोकन्यायालयात बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, आय. डी. बी. आय. बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँकेसह अन्य बँका आणि वित्तीय संस्था सहभागी झाल्या होत्या.