पुण्यातील एस.पी.कॉलेजच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या शिवाजीनगर न्यायालय ते मंडईपर्यंतच्या मेट्रोचे तसेच यासह जवळपास १५ प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले जाणार आहे. मात्र आज सकाळपासून शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी देखील जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे प्रशासनाकडून मैदानांवर पाणी साचू नये, कार्यक्रम पार पाडला जावा यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.
हेही वाचा : पावसाने पुण्याला झोडपले…रस्त्यावर पाणीच पाणी…
मात्र त्याच दरम्यान आता रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक या चार जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर पुणे जिल्ह्यासाठी पुढील २४ तासांकरिता रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे उद्या पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर पावसाचे सावट असल्याचे स्पष्ट दिसत आहे.