लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्याने टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, शेवगा, पावट्याच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
share market update bse nifty share bazar stock market
Marker roundup : ‘सेन्सेक्स’मध्ये सलग दुसऱ्या सत्रात मजबूत ६३१ अंशांची भर; दलाल स्ट्रीटवरील आजच्या तेजीमागील दडलंय काय?
bombay stock exchange update Sensex nifty share market points
Market roundup : शेअर बाजारात ‘सेन्सेक्स’ची ९०० अंशांची फेरउसळी; बाजारातील तेजीचे तीन मुख्य घटक कोणते?
low prices of tur in market
विश्लेषण : बाजारपेठेत तुरीच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांशी कोंडी कशी?
sensex BSE share market Nifty mid cap small cap
Market Roundup : शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्सची आगेकूच; मूडपालटाची कारणे काय?
boom IT sector Sensex nifty
‘आयटी’तील तेजीने सेन्सेक्सची ५६६ अंशांनी वाढ; शेअर बाजाराचे लक्ष आता अर्थसंकल्पाकडे
pune tomato prices fall
टोमॅटोचे भाव घसरले, शेतकरी हवालदिल

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ४ ते ५ टेम्पो कोबी, कर्नाटकातून घेवडा आणि पावटा प्रत्येकी ५ ते ६ टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून ५ टेम्पो शेवगा, राजस्थानातून १० टेम्पो गाजर, मध्य प्रदेशातून १८ ते २० ट्रक मटार, तामिळनाडूतून १ टेम्पो तोतापुरी कैरी, मध्य प्रदेशातून ७ ते ८ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

आणखी वाचा-विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त नगर रस्त्यावर वाहतूक बदल, नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून एक जानेवारीपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गाने

पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो १० ते १२ हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा ९० ते १०० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून २५ ते ३० टेम्पो बटाट्याची आवक झाली.

कोथिंबीर, शेपू, हरभरा गड्डीच्या दरात अल्पशी वाढ

कोथिंबिर, शेपू, हरभरा गड्डीच्या दरात अल्पशी वाढ झाली. मुळे, पालकच्या दरात घट झाली. मेथी, कांदापात, चाकवत, करडई, पुदिना, अंबाडी, राजगिरा, चुका, चवळईचे दर स्थिर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. तरकारी विभागात कोथिंबीर दीड लाख जुडी, तसेच मेथीच्या ८० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- ५०० ते १०००, मेथी – ५०० ते ८००, शेपू – ५०० ते ८००, कांदापात- ८०० ते १२००, चाकवत – ४०० ते ७००, करडई- ३०० ते ७००, पुदिना – ३०० ते ८००, अंबाडी – ४०० ते ६००, मुळे – ६०० ते १०००, राजगिरा- ४०० ते ७००, चुका – ५०० ते ८००, चवळई- ४००-६००, पालक- ८००-१२००. हरभरा गड्डी – ८०० ते १५००

आणखी वाचा-पिंपरी : घोरावडेश्वर डोंगर परिसरात निसर्ग मित्र, वनपाल घालणार गस्त; वाचा काय आहे कारण?

पपई, डाळिंब, लिंबांच्या दरात वाढ

मार्केट यार्डातील फळबाजारात लिंबू, डाळिंब, पपईच्या दरात वाढ झाली आहे. कलिंगड, खरबूज, सीताफळ, संत्री,मोसंबी, बोरे, पेरुचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी जुन्या आणि नव्या बहरातील मोसंबी ४० ते ५० टन, संत्री ७० ते ८० टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई ७ ते ८ टेम्पो, लिंबे १३०० गोणी, कलिंगड ९ ते १० टेम्पो, खरबूज २ ते ३ टेम्पो, चिकू एक हजार गोणी, पेरू ३०० ते ५०० प्लास्टिक जाळी (क्रेट),अननस ६ ट्रक, बाेरे दीड हजार गोणी, सीताफळ २ ते ३ टन अशी आवक झाली.

Story img Loader