पुणे : मार्केट यार्डातील तरकारी विभागात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक किंचित वाढली. कोथिंबिर, शेपू, कांदापात, चाकवत, पुदिन्याच्या दरात घट झाली आहे. अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.
घाऊक बाजारात कोथिंबीर, शेपूच्या शेकडा जुडीमागे ५०० रुपये, कांदापात, चाकवत, पुदिन्याच्या शेकडा जुडीमागे १०० रुपयांनी घट झाली. आवक घटल्याने अंबाडी, चवळईच्या शेकडा जुडीमागे १०० रुपये, तसेच चुक्याच्या शेकडा जुडीमागे २०० रुपयांनी वाढ झाल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.
हेही वाचा – पुणे: पिस्तूल बाळगणाऱ्या युवकाला सिंहगड रस्त्यावर पकडले
रविवारी तरकारी विभागात कोथिंबिरेच्या दीड लाख जुडी आणि मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार पालेभाज्यांच्या जुडीचे दर २० ते ३० रुपयांपर्यंत आहेत.