राज्यशास्त्राच्या प्रश्नसंचामध्ये क्रिकेटचे प्रश्न, इतिहासाच्या प्रश्नसंचामध्ये प्राणी, पक्ष्यांवरील प्रश्न अशी करामत राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत झाली असून परीक्षेमध्ये संदर्भहीन प्रश्न विचारण्यात आल्याची तक्रार उमेदवारांकडून केली जात आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यभरात राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य ज्ञान भाग १ आणि भाग २ या विषयाची परीक्षा रविवारी, तर सामान्य भाग ३ आणि भाग ४ या विषयांची परीक्षा सोमवारी घेण्यात आली. या प्रश्नपत्रिकांमध्ये संदर्भहीन प्रश्न विचारण्यात आल्याची तक्रार उमेदवारांकडून केली जात आहे. या प्रश्नपत्रिकेतील राज्यशास्त्रावरील प्रश्नसंचामध्ये क्रिकेटच्या मैदानाचा आकार किती? क्रिकेटच्या मैदानाचे क्षेत्रफळ किती असते? कोणत्या अभिनेत्याची सलग तेराव्या चित्रपटाची सिल्व्हर ज्युबिली झाली? असे प्रश्न विचारण्यात आले होते. तर, इतिहास आणि भूगोलाच्या प्रश्नसंचामध्ये ‘नर मोर नाचतो, तर मादी कोकिळा गाते, हे विधान चूक की बरोबर?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. अनेक प्रश्नांमध्ये मराठी पर्यायी शब्द उपलब्ध असतानाही हिंदी शब्दांचा वापर करण्यात आला होता, असेही उमेदवारांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Oct 2013 रोजी प्रकाशित
‘नर मोर नाचतो, तर मादी कोकिळा गाते, हे विधान चूक की बरोबर?’
क्रिकेटच्या मैदानाचे क्षेत्रफळ किती असते? कोणत्या अभिनेत्याची सलग तेराव्या चित्रपटाची सिल्व्हर ज्युबिली झाली? ‘नर मोर नाचतो, तर मादी कोकिळा गाते, हे विधान चूक की बरोबर?’ असे प्रश्न विचारण्यात आले होते.
First published on: 29-10-2013 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Referenceless questions in mpsc exam