राज्यशास्त्राच्या प्रश्नसंचामध्ये क्रिकेटचे प्रश्न, इतिहासाच्या प्रश्नसंचामध्ये प्राणी, पक्ष्यांवरील प्रश्न अशी करामत राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत झाली असून परीक्षेमध्ये संदर्भहीन प्रश्न विचारण्यात आल्याची तक्रार उमेदवारांकडून केली जात आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यभरात राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य ज्ञान भाग १ आणि भाग २ या विषयाची परीक्षा रविवारी, तर सामान्य भाग ३ आणि भाग ४ या विषयांची परीक्षा सोमवारी घेण्यात आली. या प्रश्नपत्रिकांमध्ये संदर्भहीन प्रश्न विचारण्यात आल्याची तक्रार उमेदवारांकडून केली जात आहे. या प्रश्नपत्रिकेतील राज्यशास्त्रावरील प्रश्नसंचामध्ये क्रिकेटच्या मैदानाचा आकार किती? क्रिकेटच्या मैदानाचे क्षेत्रफळ किती असते? कोणत्या अभिनेत्याची सलग तेराव्या चित्रपटाची सिल्व्हर ज्युबिली झाली? असे प्रश्न विचारण्यात आले होते. तर, इतिहास आणि भूगोलाच्या प्रश्नसंचामध्ये ‘नर मोर नाचतो, तर मादी कोकिळा गाते, हे विधान चूक की बरोबर?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. अनेक प्रश्नांमध्ये मराठी पर्यायी शब्द उपलब्ध असतानाही हिंदी शब्दांचा वापर करण्यात आला होता, असेही उमेदवारांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा