राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर दहावीच्या निकालाची विद्यार्थी, पालकांना मोठी उत्सुकता होती. शिक्षण विभागाने अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांसाठीची नोंदणी सुरू केली आहे. आता दहावीचा निकाल उद्या (२ जून) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार असल्याची राज्य मंडळाने आज घोषणा केली. तसेच पुरवणी परीक्षेच्या नोंदणीचा तपशीलही जाहीर केला. दहावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ७ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक दिली आहे.
पुणे: दहावीचा निकाल उद्या, पुरवणी परीक्षेची नोंदणीही लगेचच सुरू
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ७ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक दिली आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 01-06-2023 at 17:26 IST
TOPICSएसएससीSSCएसएससी परीक्षाSSC Examदहावीतील विद्यार्थीSSC StudentsपुणेPuneपुणे न्यूजPune News
+ 1 More
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Registration for supplementary exam immediately start after 10th result pune print news ccp 14 zws