राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर दहावीच्या निकालाची विद्यार्थी, पालकांना मोठी उत्सुकता होती. शिक्षण विभागाने अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांसाठीची नोंदणी सुरू केली आहे. आता दहावीचा निकाल उद्या (२ जून) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार असल्याची राज्य मंडळाने आज घोषणा केली. तसेच पुरवणी परीक्षेच्या नोंदणीचा तपशीलही जाहीर केला. दहावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ७ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा