पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील तब्बल ४४२ महाविद्यालयांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून नवमतदार नोंदणीसाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आला होता. या अधिकाऱ्यांकडून महाविद्यालयांमध्ये तब्बल ४६ हजार नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुण्यातून जास्तीत जास्त नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता.
राज्यासह देशाच्या विविध भागांतील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात दरवर्षी दाखल होतात. या विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी महाविद्यालयात प्रवेशावेळी मतदार म्हणून नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील ४४२ महाविद्यालयांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून नवमतदारांच्या नोंदणीसाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आला होता. तसेच प्रत्येक महाविद्यालयाने देखील त्यांच्या स्तरावर नवमतदार नोंदणीसाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले होते. या अधिकाऱ्यांकडून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मतदार म्हणून नोंद करून घेण्यात आली.

हेही वाचा >>>मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे बारामतीमध्ये शेतीसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना

Chief Minister Devendra Fadnavis announcement regarding land registration Mumbai news
कोणत्याही कार्यालयातून दस्तनोंदणीची मुभा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Sub Registrar Office, Registration , Devendra Fadnavis,
कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Tamil Nadu, Governor Ravi, Governor Ravi address,
विश्लेषण : तमिळनाडूत सलग तिसऱ्या वर्षी राज्यपाल रवी यांचा अभिभाषणापूर्वीच सभात्याग, राज्यपालांचे अभिभाषण बंधनकारक असते का?
CAG report on expenditure incurred by Arvind Kejriwal on CM residence
नूतनीकरणाची किंमत ३३ कोटी! केजरीवालांनी मुख्यमंत्री निवासस्थानावर केलेल्या खर्चासंबंधी ‘कॅग’चा अहवाल
badlapur employee Registrar Cooperative Societies Office bribery case
लाचखोर सहाय्यक निबंधक आणि सहकारी अटकेत, गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी घेतली ६० हजारांची लाच
Thane District Planning Committee meeting, Thane,
ठाणे : जिल्हा “नियोजन समिती बैठकीच्या” प्रतीक्षेत, पालकमंत्र्यांच्या अभावी बैठकीला मुहूर्त नाही
mpsc exam result list announced social welfare category
वादात सापडलेल्या एमपीएससीच्या या परीक्षेची उत्तरतालिक जाहीर, हरकतीसाठी मुदत…

याबाबत बोलताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले म्हणाल्या, ‘मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत शहरासह जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर हरकती, आक्षेप स्वीकारण्याच्या कालावधीत नवमतदारांची जास्तीत जास्त मतदार म्हणून नोंद होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खास उपक्रम, शिबिर राबविण्यात आले. त्यानुसार शहरासह जिल्ह्यातून ४६ हजारांपेक्षा जास्त नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.’

हेही वाचा >>>पुणे: भूसंपादनाअभावी वाकड-बालेवाडी पुलाचे काम रखडले

दरम्यान, राज्याच्या विविध भागातून आणि देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूळगावी मतदार म्हणून नोंदणी केली नसल्यास त्यांची नोंदणी करून घेण्यात आली आहे. ही नोंदणी ऑनलाइन करून घेण्यात आल्याने संबंधित जिल्ह्यांकडे मतदार नोंदणीचे अर्ज पाठवून देण्यात आले आहेत. तसेच जे विद्यार्थी पुण्यातील होते, त्यांची या ठिकाणी नोंदणी करण्यात आली आहे. हे सर्वच्या सर्व मतदार पुण्यातीलच नाहीत, असेही भोसले यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>पुणे: किसानपुत्र आंदोलनाचे वर्धा येथे चिंतन शिबिर

अंतिम मतदार यादीत नावे समाविष्ट
केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या सुधारणांनुसार आता वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करता येणार आहे. याशिवाय आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या मतदारांची आगाऊ नावनोंदणी देखील करता येणार आहे. या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील प्रत्येक महाविद्यालयात जिल्हा प्रशासनाकडून नवमतदार नोंदणीसाठी खास अधिकारी नियुक्त करण्यात आला होता. त्यामुळे पुण्यातून अपेक्षेप्रमाणे जास्तीत जास्त नवमतदारांची नोंदणी होऊ शकली.

या सर्व मतदारांची नावे अंतिम यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत, असेही जिल्हा निवडणूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले.

Story img Loader