पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील तब्बल ४४२ महाविद्यालयांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून नवमतदार नोंदणीसाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आला होता. या अधिकाऱ्यांकडून महाविद्यालयांमध्ये तब्बल ४६ हजार नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुण्यातून जास्तीत जास्त नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता.
राज्यासह देशाच्या विविध भागांतील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात दरवर्षी दाखल होतात. या विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी महाविद्यालयात प्रवेशावेळी मतदार म्हणून नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील ४४२ महाविद्यालयांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून नवमतदारांच्या नोंदणीसाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आला होता. तसेच प्रत्येक महाविद्यालयाने देखील त्यांच्या स्तरावर नवमतदार नोंदणीसाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले होते. या अधिकाऱ्यांकडून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मतदार म्हणून नोंद करून घेण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा