केंद्र शासनाच्या वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाकडे (डब्ल्यूडीआरए) १७४ वखार केंद्रांची सर्वाधिक नोंदणी करण्यात आली आहे. वखार केंद्राची नोंदणी करण्यात देशात महाराष्ट्र अव्वल ठरले आहे. केंद्र सरकारच्या वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाचा बारावा वर्धापन दिन नवी दिल्लीत नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्राधिकरणाचे संचालक मुकेशकुमार जैन यांच्या हस्ते वखार महामंडळाचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज कुमार, सहसचिव धीरज साहू, केंद्रीय वखार महामंडळाचे अध्यक्ष अरुण कुमार श्रीवास्तव, राज्य वखार महामंडळाचे संचालक अनुज कुमार, महामंडळाचे सरव्यवस्थापक अविनाश पांडे आदी या प्रसंगी उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in