प्रथमेश गोडबोले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कागदपत्रे ऑनलाइन जमा करणे  शक्य, रांगेत ताटकळणे टळणार

दस्तनोंदणीसाठीच कागदपत्रे आता घरबसल्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या संगणक प्रणालीवर अपलोड करता येतील. त्याचबरोबर दस्तनोंदणीसाठी वेळही आरक्षित करता येईल.

डिजिटल डॉक्युमेंट अपलोडिंग सध्या ही सेवा केवळ मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. नंतर ती राज्यभर सुरू करण्यात येईल, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी दिली.

विभागाच्या पब्लिक डाटा एण्ट्री (पीडीई) या संगणक प्रणालीमध्ये ‘ई-स्टेप इन’ आणि ‘डिजिटल डॉक्युमेंट अपलोडिंग’ या दोन्ही सुविधा एकत्रित करण्यात आल्या आहेत. ज्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदवायचा आहे, त्या कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेपैकी ‘ई-स्टेप इन’ सुविधेसाठी राखून ठेवलेल्या वेळेत आपल्या सोयीची वेळ आरक्षित करता येऊ शकेल. त्यामुळे रांगेत ताटकळणे टळेल. शिवाय, नागरिकांच्या वेळेचीही बचत होईल.

ई-स्टेप इन सुविधेनुसार वेळ आरक्षित करताना संबंधित दस्तनोंदणी कार्यालयाची वेळ, यापूर्वी आरक्षित केलेल्या वेळा आणि उपलब्ध वेळ आपल्याला दिसू शकेल. तर, ‘डिजिटल डॉक्युमेंट अपलोडिंग’मध्ये आपल्याला घरातून दस्तनोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे विभागाच्या संकेतस्थळावर भरता येतील.

पीडीएफ, वर्ल्ड फॉरमॅटमध्ये ही माहिती भरणे आवश्यक आहे. ही माहिती भरल्यानंतर दुय्यम निबंधक ती पडताळून पाहतील. माहिती परिपूर्ण असल्यास ठरलेल्या वेळेत संबंधित नागरिक दस्तनोंदणी कार्यालयात येईल. भरलेल्या माहितीमध्ये काही शंका असल्यास संबंधित नागरिकाला निबंधक कार्यालयातून आगाऊ सूचना मिळेल.

त्यामुळे शंका असलेली कागदपत्रे नोंदणीच्या वेळी घेऊन जाण्यात अडचण येणार नाही. दस्तनोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांपैकी शेवटच्या पानावर स्वाक्षरी, अंगठय़ाचे ठसे घेतले जातील. तसेच परिशिष्टाचे कागद जोडले जातील.

केवळ हेच दस्तऐवज सव्‍‌र्हरवर टाकण्यात येतील. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि विभागाच्या सव्‍‌र्हरवरील ताणही कमी होईल. स्कॅन केलेल्या दस्तऐवजासाठी सव्‍‌र्हरवर जास्त जागा लागते, तिची बचत होईल, असे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी सांगितले.

‘डिजिटल डॉक्युमेंट अपलोडिंग’ सुविधा सध्या केवळ मुंबईपुरती प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील अनुभव लक्षात घेऊन या सुविधेचा विस्तार करण्यात येईल.

– अनिल कवडे, नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र