देशभरातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची ‘आयसर ॲप्टिट्यूट टेस्ट’ (आयएटी) ९ जूनला घेण्यात आहे. या प्रवेश परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ऑनलाइन अर्जांसाठीची अंतिम मुदत १३ मे आहे.

देशभरात बेहरामपूर, मोहाली, कोलकाता, पुणे, तिरुअनंतपुरम, तिरुपती आणि भोपाळ अशा एकूण सात ठिकाणी आयसर कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांत विज्ञान संशोधन क्षेत्रातील आयसरची ओळख निर्माण झाली आहे. आयसरमध्ये चार वर्षांचा विज्ञान पदवी (बीए) अभ्यासक्रम आणि पाच वर्षांचा एकात्मिक पदव्युत्तर पदवी (बीएस-एमएस) हा दुहेरी पदवी अभ्यासक्रम राबवला जातो. अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी विद्यार्थी बारावी उत्तीर्ण, बारावीला जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र यापैकी तीन विषय असणे आवश्यक आहे. आयएटी ही प्रवेश परीक्षा संगणक आधारित असते. अधिक माहिती http://www.iiseradmission.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.