पुणे : राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर केळकर यांच्या कन्या आणि संग्रहालयाच्या व्यवस्थापन मंडळ सदस्या रेखा हरिभाऊ रानडे (वय ८१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे हे त्यांचे पुत्र होत.
संग्रहालयाच्या उभारणीमध्ये दिनकर केळकर यांना रेखा रानडे यांनी मोलाची साथ दिली. बावधन येथील प्रस्तावित विकास प्रकल्पाद्वारे संग्रहालयास आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होण्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले.