भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी लाहोरच्या तुरुंगामध्ये हसत फासावर गेलेल्या शहीद भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम हरी राजगुरू यांचे कुटुंबीय घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार आहेत.
भगतसिंग यांचे पुतणे कुलतारसिंग यांचा मुलगा किरणजितसिंग सहारणपूर येथून येणार आहे. सुखदेव यांचे नातू अनुज थापर उत्तर प्रदेशातून, तर राजगुरू यांचा पुतण्या सत्यशील राजगुरू आणि स्नुषा आरती राजगुरू पुण्याहून संमेलनासाठी येणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी दिली.
देसडला म्हणाले, या वीरांचे  स्वातंत्र्यलढय़ातील योगदान बहुमूल्य आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुटुंबियांना आमंत्रित केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा