पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला, पानशेत धरणे पूर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरलेली आहेत. धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात आणि येणाऱ्या पाण्यात वाढ होत आहे. परिणामी तरी येत्या दोन तासांमध्ये नदीपात्रामध्ये विसर्ग वाढविण्यात येण्याची दाट शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली.

हेही वाचा <<< Maharashtra News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर!

सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत टेमघर धरणात ४० मिलिमीटर, वरसगाव धरणक्षेत्रात २० मि.मी., पानशेत धरण परिसरात १८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. मंगळवारी सकाळपासून चारही धरणांच्या परिसरात जोरदार बरसत आहेत. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत १९२९ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. सकाळी ११ वाजल्यानंतर हा विसर्ग ३४२४ क्युसेकपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधीत नागरिकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी.सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता यो.स.भंडलकर यांनी सांगितले.

Story img Loader