पुणे : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात परतला आहे. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत झालेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पुणे : आर्थिक वादातून वकिलाकडून मित्राच्या वडिलांचे अपहरण

हेही वाचा – Sharad Pawar in Pune Protest: “मला एका गोष्टीचं दु:ख होतंय की…”, शरद पवारांनी मांडली भूमिका; पुण्यात भर पावसात आंदोलन, उपस्थितांना दिली शपथ!

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे काठोकाठ भरली आहेत. सध्या चारही धरणांत मिळून एकूण २८.३४ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९७.१८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. शनिवारी सकाळपर्यंत टेमघर धरण परिसरात ४८ मिलीमीटर, वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात प्रत्येकी २४ मि.मी. आणि खडकवासला धरण क्षेत्रात ८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे सकाळी दहा वाजता वरसगाव धरणातून ८६२ क्युसेक, तर पानशेत धरणातून ८४९ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. हे पाणी खडकवासला धरणात येत असल्यामुळे सकाळी ११ वाजता या धरणातून मुठा नदीपात्रात २१४० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. दुपारी बारा वाजता विसर्गात वाढ करून ४१५० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Releasing water from khadakwasla dam has started again pune print news psg 17 ssb