पुणे : पालेभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली. पालेभाज्यांच्या दरात घट झाल्याने गृहिणींंना दिलासा मिळाला. पालेभाज्यांच्या दरात घट झाली असली तरी, फळभाज्यांचे तेजीतील दर टिकून आहेत. मागणी वाढल्याने ढोबळी मिरची, मिरची, कोबी, फ्लाॅवरच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (३० जून) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्यात बाजारात ७० ते ८० ट्रक एवढी फळभाज्यांची आवक झाली होती. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून ७ ते ८ टेम्पो हिरवी मिरची, तमिळनाडूतून १ टेम्पो तोतापुरी कैरी, कर्नाटक, गुजरातमधून मिळून २ टेम्पो कोबी, कर्नाटकातून २ टेम्पो घेवडा, २ टेम्पो पावटा, हिमाचल प्रदेशातून ३ टेम्पो मटार, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून ३ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातील इंदूर भागातून ७ ते ८ टेम्पो गाजर, मध्य प्रदेशातून ९ ते १० टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा – पालखी सोहळा : संभाजी भिडे गुरुजींना पुणे पोलिसांनी बजावली नोटीस

पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ५ ते ८ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, फ्लाॅवर ७ ते ८ टेम्पो, भुईमूग शेंग २०० ते २५० गोणी, गाजर २ ते ३ टेम्पोे, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, गावरान कैरी २ टेम्पो, कांदा ५० ते ६० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ३० ते ४० टेम्पो बटाट्याची आवक झाली.

हेही वाचा – बारामती पाठोपाठ अजित पवारांचा पिंपरी-चिंचवड बालेकिल्ला ढासळण्याच्या मार्गावर; १६ माजी नगरसेवकांनी घेतली शरद पवारांची भेट!

मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी दीड लाख जुडी कोथिंबीर, मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर कोथिंबीर १५०० ते २०००, मेथी १५०० ते २५००, शेपू १००० ते २०००, कांदापात १५०० ते २५००, चाकवत ७०० ते १२००, करडई ८०० ते १५००, पुदिना ८०० ते १५००, अंबाडी ८०० ते १०००, मुळे १५०० ते २५००, राजगिरा ८०० ते १५००, चुका ८०० ते १२००, चवळई ८०० ते १२००, पालक १५०० ते २५०० असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relief for housewives how much has the price of leafy vegetables reduced pune print news rbk 25 ssb