महाराष्ट्र बँकेतर्फे दुष्काळग्रस्तांना मदतनिधी म्हणून मुख्यमंत्री मदत निधीला दोन कोटी एक्कावन्न लाखांची देणगी देण्यात आली. या रकमेचा धनादेश नुकताच बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र सिंग यांच्या हस्ते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. या प्रसंगी बँकेचे सरव्यवस्थापक एस. भरतकुमार, शाखाप्रमुख अतुल जोशी, मुंबई शहर विभागाचे सरव्यवस्थापक पी. एम. खान उपस्थित होते. तसेच बँकेच्या वतीने उत्पादन कार्य ताबडतोब सुरू करण्याच्या दृष्टीने नवे कर्जदार तसेच सध्याच्या कर्जदारांना नव्या कर्जाना मंजुरी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लहान स्वरूपाचे जलसिंचन, बैल, दुग्धव्यवसायासाठी पशुखरेदी आदी विकासकामांसाठी विविध प्रकारची मुदत कर्जे, असे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
महाराष्ट्र बँकेतर्फे दुष्काळग्रस्तांना दोन कोटींचा मदतनिधी
महाराष्ट्र बँकेतर्फे दुष्काळग्रस्तांना मदतनिधी म्हणून मुख्यमंत्री मदत निधीला दोन कोटी एक्कावन्न लाखांची देणगी देण्यात आली. या रकमेचा धनादेश नुकताच बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र सिंग यांच्या हस्ते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. या प्रसंगी बँकेचे सरव्यवस्थापक एस. भरतकुमार, शाखाप्रमुख अतुल जोशी, मुंबई शहर विभागाचे सरव्यवस्थापक पी. एम. खान उपस्थित होते.
First published on: 22-03-2013 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relief fund of rs 2 cr to famine stricken by maharashtra bank