पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या विविध समस्यांचे निराकरण, त्यांना भेडसावणारे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महापालिका प्रशासन कृती आराखडा तयार करणार आहे. त्यासाठी सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांची नोडल तर सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांची सहाय्यक समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सोसायटीधारक आणि समाविष्ट गावांतील पाणी समस्यांबाबत आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये सोसायटी फेडरेशनचे पदाधिकारी व आयुक्त शेखर सिंह यांची नुकतीच बैठक झाली. सोसायटीधारकांच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी चिखली-मोशी-चऱ्होली पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे आणि पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी धोरणात्मक आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने दोन अधिका-यांची नियुक्ती केली आहे.
हेही वाचा >>> गुंतागुंतीच्या मेंदूशस्त्रक्रियेने आफ्रिकेतील महिलेला नवजीवन
गृहनिर्माण संस्थांना पालिकेशी संबंधित मूलभूत सुविधा अग्रक्रमाने उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व जलनि:सारण व्यवस्थापन, कर आकारणी व कर संकलन, विद्युत व रस्ते (स्थापत्य) विषयक कामकाजाबाबत कार्याभ्यास, कार्याचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. गृहनिर्माण संस्थांना भेडसावणा-या विविध समस्यांचे तत्काळ निवारण करण्यासाठी, महापालिकेच्या विभागांमध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. नोडल अधिकारी व सहाय्यक समन्वय अधिका-यांनी वस्तुस्थितीचे मूल्यमापन केल्यानंतर त्यासंदर्भात काढलेले निष्कर्ष, कार्यपद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी विभागांना निर्देश द्यावेत. कामकाजाचा अहवाल आयुक्तांना सादर करावा लागणार आहे.
हेही वाचा >>> सरकारी घोळ! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या कामाला ‘ब्रेक’
कृत्रिम पाणी टंचाई
ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांचे लागेबांधे असून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जाते. यात महापालिका अधिकारीही सामील आहेत, अशा तक्रारी येत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पाणी पुरवठ्याबाबत नियोजनात होणारी ठेकेदारी बंद करावी. प्रशासकीय पातळीवर समान पाणीपुरवठा धोरण अवलंबावे. ज्यामुळे विशिष्ट भागातील नागरिकांना पाणी समस्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. –महेश लांडगे, आमदार भोसरी