भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामधील राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील नवीन कात्रज बोगदा ते वारजेदरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर असलेली अतिक्रमणे काढण्याच्या सूचना एनएचएआयकडून देण्यात आल्या आहेत. ‘एनएचएआय’ने अतिक्रमणे काढल्यास त्याचा खर्च हा संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>‘सावधान! नवले ब्रिज पुढे आहे’; सतत अपघात होणाऱ्या नवले ब्रिजवर लागले अनोखे बॅनर

अतिक्रमणामुळे राष्ट्रीय महामार्ग चारवरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विभागीय आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि एनएचएआय पुणेचे प्रकल्प संचालक यांच्या २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार या सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये व दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यालगतच्या मिळकतधारकांनी अनधिकृतपणे केलेले अतिक्रमण, विनापरवाना बांधकाम स्वखर्चाने त्वरित काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>पुणे: दुर्मीळ मेंदुविकाराने ग्रासलेली १९ वर्षीय तरुणी शस्त्रक्रियेद्वारे अपस्मारमुक्त

राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये नवीन कात्रज बोगदा ते वारजेदरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर अस्तित्वातील असलेल्या पाणीपुरवठा, टेलीफोन, विद्युत वाहिनी, ओएफसी केबल्स आदी सेवा वाहिन्या संबंधित यंत्रणेने त्वरित स्वखर्चाने काढून घ्याव्यात. अतिक्रमण काढताना काही नुकसान किंवा असुविधा झाल्यास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी. ही अतिक्रमणे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या दि कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवेज (लॅन्ड ॲण्ड ट्राफिक) ॲक्ट २००२ अन्वये पाडण्यात येतील आणि त्याचा खर्च, दंड संबंधित धारकाकडून वसूल करण्यात येणार आहे, असेही एनएचएआयच्या पुणे विभागाचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remove encroachments on service roads nhai instructions pune print news amy