लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या केंद्रीय कृषी-हवामानशास्त्रीय वेधशाळेचे नूतनीकण करण्यात आले आहे. देशातील सर्वात जुन्या वेधशाळांपैकी ही एक वेधशाळा आहे.

केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रवीचंद्रन यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या वेधशाळेचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. महापात्रा, सहसचिव डी. सेन्थिल पांडियन, हवामान संशोधन आणि संशोधन विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर, पुणे वेधशाळेचे डॉ. अनुपम कश्यपी आदी या वेळी उपस्थित होते. केंद्रीय कृषी-हवामानशास्त्रीय वेधशाळेची (सीएजीएमओ) स्थापना १८५६ मध्ये करण्यात आली. या वेधशाळेतर्फे कृषी-हवामानशास्त्रातील विविध प्रकारच्या नोंदी घेतल्या जातात. पुणे विभागातील हवामान अंदाजांसाठी ही वेधशाळा महत्त्वाची मानली जाते.

हेही वाचा… पिंपरीत चारचाकीला प्राधान्य

हवामान संशोधन आणि संशोधन विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर म्हणाले, की १८५६ मध्ये ही वेधशाळा सुरू झाली. हवेची गुणवत्तेपासून मातीच्या तापमानापर्यंत वेगवेगळ्या घटकांचा वेध घेतला जातो. जागतिक हवामानशास्त्र संस्थेने या वेधशाळेला मान्यता दिली आहे.

हेही वाचा… कोथरूडमधील सोसायट्यांच्या समस्यांचा आढावा, जलदगतीने उपाययोजना करण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या सूचना

हवामानाची माहिती केवळ हवामान विभाग मिळवू शकत नाही. त्यासाठी वेगवेगळे घटक, संस्थांची मदत मिळते. त्यात कृषी विभाग, कृषी महाविद्यालयांचाही समावेश आहे. देशभरात १३५ अग्रो क्लायमेटिक झोन्स आहे. प्रत्येक जिल्ह्याला माहिती दिली जाते. २०२० पासून ब्लॉक स्तरावर नोंदी घेऊन हवामाव अंदाज वर्तवले जातात. आजच्या काळात हवामानाचा एकात्मिक विचार करण्याची गरज आहे. त्या माध्यमातून हवामान बदलांचा अभ्यास करता येईल, असे डॉ. महापात्रा यांनी सांगितले.

हेही वाचा… पुणे : वैकुंठ स्मशानभूमी परिसरातील समस्या दूर करण्यासाठी समिती, चंद्रकांत पाटील यांची माहिती

शंभर वर्षांहून अधिक काळ एका ठिकाणी वेगवेगळ्या घटकांची नोंद घेणे ही मोठी गोष्ट आहे. आताच्या काळात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून घेतला पाहिजे. सहकार्याने काम करण्यासाठी अधिकाधिक संस्थांशी जोडले गेले पाहिजे. अशा वेधशाळा वाढल्या पाहिजे. त्यातून अधिकाधिक विदा हाती येऊन हवामान अंदाजांसाठी उपयुक्त ठरेल. हवामान अंदाजांमध्ये सुधारणा करता येईल. विदा तफावत (डेटा गॅप) ही मोठी अडचण आहे. सातत्याने विदा मिळण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत, असे मत डॉ. रवीचंद्रन यांनी मांडले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renovation of over 100 year old central agro meteorological observatory in pune pune print news ccp 14 dvr