अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या मतदारयादीमध्ये चुकांची पुनरावृत्ती झाल्याची बाब शुक्रवारी उघड झाली आहे. काही मृत सभासदांची नावे यामध्ये समाविष्ट करण्यात आली असून ही बाब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत सुधारित मतदारयादी प्रकाशित करण्याची मागणी सुनील महाजन आणि शांतिलाल सुरतवाला यांनी केली आहे.
शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार सभासदांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये रवींद्र भट, अशोक चव्हाण, ज्योत्स्ना देवधर, विष्णू लोखंडे, संतोष नवले, बबन शिंदे आणि सतीश तारे या मृत सभासदांची नावे समाविष्ट आहेत. तर, सुरेखा पुणेकर यांचे नाव आणि पत्ता यादीमध्ये नाही. राजन मोहाडीकर यांचाही पत्ता नाही. मात्र, त्यांच्या पत्नी सभासद असल्याचा पत्ता छापण्यात आला आहे. ही बाब निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सुनील महाजन आणि शांतिलाल सुरतवाला यांनी निदर्शनास आणून देत सुधारित मतदारयादी प्रकाशित करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब भोईर यांच्याकडे केली आहे.

Story img Loader