भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबधित महिलेवर लैंगिक अत्याचाराची घटना सोलापूर येथे घडली होती. त्यामुळे तो गुन्हा डेक्कन पोलिसांनी तात्काळ सोलापूर पोलिसांकडे वर्ग केला. त्यानंतर श्रीकांत देशमुख यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ” पीडित महिलेने महिला आयोगाकडे १५ तारखेला तक्रार केली होती.पण त्यावेळी कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली नव्हती. त्यानंतर पीडित महिलेने १७ तारखेला डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रारी दिली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसानी गुन्हा दाखल केला.पण त्या महिलेवर सोलापूर येथे सुरुवातीला अत्याचार झाला होता.त्यामुळे डेक्कन पोलिसानी तो गुन्हा सोलापूर पोलिसांकडे वर्ग केला.या प्रकरणाचा सात दिवसाच्या आतमध्ये तपास करून कारवाईचा अहवाल महिला आयोगा समोर सादर करण्याचे आदेश सोलापूर पोलिसांना देण्यात आले आहेत” अशी प्रतिक्रिया चाकणकर यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा