पुणे : ससून रुग्णालयाच्या नव्या इमारतीतील लिफ्टमध्ये शुक्रवारी दुपारी सहाजण अडकले. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांची सुखरूप सुटका केली.

ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील लिफ्टमधून दुपारी बाराच्या सुमारास रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचारी तळमजल्यावर निघाले होते. लिफ्ट चौथ्या आणि पाचव्या मजल्यांच्या मधोमध अडकली. लिफ्टमधील नागरिकांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी लिफ्ट तळमजल्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दालाला याबाबतची माहिती दिली.

Road tax collection, heavy vehicles, Mumbai,
मुंबईच्या वेशीवर जड-अवजड वाहनांकडून २०२७ नंतरही पथकर वसुली?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Five Naxalites killed in encounter with security forces
छत्तीसगडमध्ये दोन महिलांसह पाच नक्षलवादी ठार
misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?
Female officer of provident fund office assaulted Shivajinagar police files case against businessman
भविष्य निर्वाह कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवाजीनगर पोलिसांकडून व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Two patients in Nagpur diagnosed with HMPV
धक्कादायक… नागपुरात ‘एचएमपीव्ही’चे रुग्ण… आता आयसीएमआर…
pistol 28 cartridges seized from passenger at pune airport
पुणे विमानतळावर प्रवाशाकडून २८ काडतुसे जप्त
Woman police officer assaulted by woman on bike
दुचाकीस्वार महिलेकडून महिला पोलिसाला धक्काबुक्की; वारजे भागातील घटना

हेही वाचा – पुणे : ‘स्वच्छ’ला पुन्हा तात्पुरती मुदतवाढ; शहरातील कचरा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

हेही वाचा – केळीच्या विम्यासाठी दहा हजार बोगस अर्ज; जळगावमधील प्रकार

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखले. लिफ्टमध्ये अडकलेले सहाजण घाबरले होते. जवानांनी लिफ्टचा दरवाजा वाकवला. लिफ्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून लिफ्ट सुरू केली. लिफ्टमध्ये अडकलेल्या दोन महिलांसह सहाजणांची सुटका केली. अग्निशमन दलाचे अधिकारी संजय रामटेके, प्रशांत गायकर, सचिन चव्हाण, ओंकार साखरे, सुनिल नामे, केतन नरके, परेश जाधव, अक्षय शिंदे आदी मदतकार्यात सहभागी झाले होते.

Story img Loader