पिंपरी: अपुऱ्या सोयीसुविधा मिळत असल्याच्या निषेधार्थ पिंपरीतील महिंद्रा अँथिया सोसायटीतील रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात मोर्चा काढला. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने अनेक समस्या निदर्शनास आणून देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने रहिवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला.

हेही वाचा <<<Maharashtra News Live : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

हेही वाचा <<<बागेत खेळणाऱ्या शाळकरी मुलींशी अश्लील कृत्य; एकाच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या सोसायटीतील रहिवाशी गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी त्रस्त आहेत. बांधकाम व्यावसायिकाने अनेक सुविधांची आकर्षक जाहिरात केली होती. प्रत्यक्षात तशा सोयी दिलेल्या नाहीत, अशी रहिवाशांची तक्रार आहे. येथील समस्यांची माहिती सातत्याने विकसकांना दिली जात होती. मात्र, त्यांच्याकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी अखेर रस्त्यावर उतरण्याचा मार्ग पत्करला. या आंदोलनात जवळपास ४०० रहिवाशी सहभागी झाले होते. त्यात महिला व लहान मुलांचाही समावेश होता.

हेही वाचा <<<अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रावर कोयत्याने वार;  कर्वेनगर भागातील घटना

यासंदर्भात येथील रहिवासी अभय असलकर यांनी सांगितले की, सोसायटीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सदोष आहे. पुरेशी क्षमता नसलेला व अपात्र कर्मचाऱ्यांकडून देखभाल होत असलेल्या या प्रकल्पातील मैला वारंवार बाहेर येतो. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. इमारतींच्या पायामध्ये सतत पाण्याचा प्रवाह मुरतो. इतरही अनेक समस्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

Story img Loader