पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील खडकवासला वगळता इतर तिन्ही धरणांच्या परिसरात बुधवारी दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली. सध्या चारही धरणांमधील पाणीसाठा ७३ टक्क्यांवर पोहोचला आहे. पुढील काही दिवस धरणांच्या परिसरात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमधील २१.३७ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ७३.३२ टक्के एवढा झाला आहे. दिवसभरात टेमघर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात पावसाने विश्रांती घेतली, तर खडकवासला धरण परिसरात ३० मिलिमीटर पाऊस पडला. शहराच्या विविध भागात बुधवारी सायंकाळी दीर्घ विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहराजवळ असलेल्या खडकवासला धरणाच्या परिसरातही चांगला पाऊस झाला. सध्या टेमघर धरण ६१ टक्के, वरसगाव आणि पानशेत ही धरणे अनुक्रमे ७१ टक्के आणि ७७ टक्के, तर खडकवासला हे धरण यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरलेले आहे.

raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
thane police
कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणक्षेत्रात दिवसभरात चार मि.मी. पावसाने हजेरी लावली. सध्या या धरणात ८० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यातील इतर धरणांच्या परिसरातही पावसाने उघडीप दिली. सध्या येडगाव, घोड, चासकमान आणि वीर ही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असल्यामुळे या धरणांमधून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, कंसात टक्क्यांत

टेमघर २.२५ (६०.६४), वरसगाव ९.१७ (७१.४९), पानशेत ८.२५ (७७.५३), खडकवासला १.७० (८६.२४), भामा आसखेड

७.०८ (९२.३७), पवना ६.८५ (८०.५१), गुंजवणी ३.१२ (८४.४८), निरा देवघर ७.६६ (६५.३३), भाटघर १७.०४ (७२.४९), वीर ९.२४ (९८.२१) आणि उजनी ३८.०५ (७१.०२)

Story img Loader