लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात सकाळच्या सत्रात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चिंचवडमधील मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत ११२६४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. १६.९७ टक्के मतदान झाले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात जगताप कुटुंब आणि राहुल कलाटे या पारंपरिक राजकीय विरोधकांमध्ये चौथ्यांदा लढत होत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर होत असलेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत रिंगणात उतरलेले त्यांचे बंधू शंकर जगताप आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून कलाटे यांच्यात दुरंगी लढत होत आहे. जगताप यांच्यापुढे बालेकिल्ला राखण्याचे आव्हान असून राष्ट्रवादी आणि कलाटे यांच्या अस्तित्वाची लढाई आहे.
आणखी वाचा-अजितदादा लाखांच्या मताधिक्यानी निवडून येतील – रुपाली चाकणकर
चिंचवड विधानसभा मतदारसंघ राज्यात सर्वात मोठा आहे. चिंचवडमध्ये एकूण ६,६३,६२२ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार ३,४८,४५०,महिला मतदार ३,१५,११५ असून तृतीयपंथी ५७ मतदार आहेत. त्यापैकी सकाळी ११ वाजेपर्यंत पुरुष ६५४३२, महिला ४७२१४ आणि इतर १ अशा ११२६४७ मतदानाचा हक्क बजाविला आहे. टक्केवारी १६.९७ झाली आहे.