नव्या वर्षांचे स्वागत करताना हॉटेल आणि बार मध्यरात्री दीडपर्यंत सुरू ठेवता येतील. संबंधितांना तशी मुभा पुणे पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे नववर्षांचा उत्साह रात्री दीडनंतर आवरता घ्यावा लागणार आहे.
शहरात सरत्या वर्षांला निरोप देण्याची तयारी जोरात सुरू झाली आहे. हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट, रेस्टोबार आणि परमिट रूम चालकांसाठी ‘थर्टी फस्ट’ची रात्र उत्तम कमाईची ठरते. त्या दिवशी मोठय़ा संख्येने येणारा ग्राहकवर्ग विचारात घेऊन हॉटेलचालकांकडून जय्यत तयारी सुरू असली, तरी ३१ डिसेंबरच्या रात्री हॉटेल व बार किती वाजेपर्यंत उघडे ठेवता येतील याबाबत अद्यापपर्यंत अनिश्चितता होती.
राज्य सरकारने ३१ डिसेंबरच्या रात्री हॉटेल, परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पुणे पोलीस आयुक्तांनी शहरातील हॉटेल आणि परमिट रूम मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार त्या दिवशी या व्यावसायिकांना मध्यरात्री दीडपर्यंत व्यवसाय करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा