पुणे : रेल्वेने गाडीच्या जुन्या डब्यांचा वापर करून त्यातच उपाहारगृह सुरू करण्याची अभिनव योजना राबविली आहे. पुणे स्थानकावर ताडीवाला रस्त्याच्या बाजूच्या वाहनतळात रेल्वेच्या डब्यात उपाहारगृह उभारण्यात आले आहे. हे उपाहारगृह बुधवारपासून (ता. २२) सुरू करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेल्वे प्रशासनाने २०२० पासून ‘रेस्टॉरन्ट ऑन व्हील्स’ ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. यात रेल्वेच्या जुन्या डब्यांचे उपाहारगृहांमध्ये रुपांतर करण्यात आले. देशभरात अनेक स्थानकांच्या आवारात ही उपाहारगृहे सुरू करण्यात आली. देशात पहिले अशा स्वरुपाचे उपाहारगृह पश्चिम बंगालमधील असनसोल स्थानकावर उभे राहिले. त्यानंतर मध्य रेल्वेच्या पुणे विभागात मागील वर्षी डिसेंबर महिन्यात चिंचवड स्थानकावर हा प्रयोग करण्यात आला. त्यानंतर पुणे स्थानकावर हे उपाहारगृह आता सुरू झाले आहे.

हेही वाचा – सणासुदीची वाहनखरेदी जोरात! जाणून घ्या पुणेकरांची पसंती कशाला…

या उपाहारगृहाचे उद्घाटन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्यासह रेल्वेचे इतर अधिकारी आणि हल्दीरामचे संचालक नीरज अगरवाल यांच्या उपस्थितीत झाले. आगामी काळात आकुर्डी, बारामती आणि मिरज स्थानकांवरही अशा स्वरुपाचे उपाहारगृह सुरू होणार आहे.

रेल्वेला मिळणार लाखोंचे उत्पन्न

रेल्वेकडून रेस्टॉरन्ट ऑन व्हील्स चालविण्यास देण्यासाठी निविदा काढली जाते. पुणे स्थानकावरील या उपाहारगृहाचे कंत्राट हल्दीराम या कंपनीला मिळाले आहे. या कंपनीला पाच वर्षांसाठी हे कंत्राट मिळाले. त्यातून रेल्वेला वर्षाला ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल.

हेही वाचा – पुणे : प्रवाशांसाठी खुशखबर! विमानतळावरील रांगेतून आता होणार सुटका

अशी आहे रचना…

  • रेल्वेच्या डब्याचे उपाहारगृहामध्ये रुपांतर
  • लांबी सुमारे २४ मीटर आणि रुंदी ३.२५ मीटर
  • रेल्वेचा जुना डबा वापरात आणून त्याचा वापर
  • उपाहारगृहाची आसनक्षमता ४०
  • उपाहारगृह २४ तास खुले असणार
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Restaurant on wheels at pune railway station unique facilities for passengers pune print news stj 05 ssb