पुणे : मेट्रोच्या कामासाठी जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी चौक ते चर्च चौक दरम्यान बंद केलेली दुहेरी वाहतूक तीन वर्षांनी पूर्ववत करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. बुधवारपासून (१ मे) या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याने पिंपरीकडून पुण्यात येणाऱ्या वाहनचालकांचा वळसा टळणार आहे.

मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी बोपोडी चौक ते चर्च चौक या दरम्यानच्या वाहतुकीत मार्च २०२१ मध्ये बदल करण्यात आले होते. त्यानुसार बोपोडी चौकातून पुण्याकडे येणारी वाहने डावीकडे वळविण्यात आली होती. पुण्याकडे येणारी वाहतूक खडकी बाजार, खडकी बाजार बस स्थानक, अष्टविनायक मंदिर, मुळा रस्त्याने वळविण्यात आली होती. खडकी बाजारमधून जाणाऱ्या वाहनचालकांना खडकी रेल्वे स्थानक, बोपोडी चौकमार्गे पिंपरीकडे जावे लागत होते. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात बोपोडी चौक ते संविधान चौक या दरम्यानचा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता खुला करण्यात आला आहे. रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे.

Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Three days holiday in school
तीन दिवसांची सुट्टी! मतदानावर काय परिणाम…
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
Pakistan Lawyer Demands Shadman Chowk Should Name After Bhagat Singh
लाहोरमधील चौकाला भगत सिंहांचं नाव देण्याची मागणी फेटाळली; दहशतवादी म्हणत केली अवहेलना!
Aamir Khan Karisma Kapoor Raja Hindustani kiss
“तीन दिवस…”, ‘राजा हिंदुस्तानी’तील आमिर खान-करिश्मा कपूरच्या किसिंग सीनबाबत दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

हेही वाचा – नसरापूर येथे महायुतीची सभा; पुणे सातारा रस्त्यावर वाहतूक विस्कळित

हेही वाचा – ‘शिरूर’च्या दोन्ही उमेदवारांचे भोसरीवर लक्ष; काय आहे कारण?

दृष्टीक्षेपात वाहतूक बदल

  • बोपोडी चौक ते खडकी बाजार रस्ता दुहेरी वाहतूक
  • बोपोडी चौक ते होळकर चौक दरम्यान एलफिस्टन रस्त्यावर जड वाहतुकीस बंदी
  • चर्च चौक ते आयुध चौकादरम्यान जनरल थोरात मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू.