लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: खडकवासला धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या बुलढाण्यातील नऊ मुली बुडाल्याची घटना सोमवारी (१५ मे) सकाळी घडली. त्यातील दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाकडून धरणाच्या जलाशयात उतरण्यास निर्बंध घालण्यात येणार आहेत. तसेच ५०० रुपये दंडासह कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

खडकवासला धरण शहरापासून अत्यंत जवळ असल्याने पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. सध्या उन्हाळी सुट्या असल्याने धरणानजीकच्या चौपाटीवर पर्यटकांची गर्दी असते. अनेक पर्यटक जलाशयात उतरतात. मात्र, धरणाच्या जलाशयात उतरण्यास बंदी आहे, अशा आशयाचे ठिकठिकाणी फलक लावले असून धरण परिसरात दहा सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. तसेच पोलीस विभागाकडून देखील सुरक्षेसाठी मदत घेत धरणात उतरणाऱ्यांकडून ५०० रुपये दंड देखील आकारला जाणार आहे. सोमवारी घडलेला दुर्दैवी प्रकार पर्यटकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी घडलेला नाही. दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या या पर्यटक मुलींनी धरणाच्या मागील बाजूने पाण्यात प्रवेश केला होता. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा- धक्कादायक! पुणेकरांना चार महिने पुरेल एवढ्या पाण्याची ‘अशी’ होते गळती

दरम्यान, खडकवासला धरणाच्या दोन्ही बाजूस २० ते २२ कि.मीचे पाणलोट क्षेत्र आहे. सिंहगड किल्ला, तसेच खासगी हॉटेल, निवासस्थाने असल्याने या ठिकाणी पर्यटकांची कायम गर्दी असते. त्यामुळे धरण सुरक्षा म्हणून ५०० मीटर परिघात दहा सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून शनिवार, रविवार सुट्यांच्या दिवशी पोलिसांकडूनही सुरक्षेसाठी मदत घेतली जात आहे.

धरणाजवळ चौपाटी असलेल्या भागात सार्वजनिक बांधकाम आणि वन विभागाच्या साहाय्याने नुकत्याच जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. धोकादायक अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. तसेच दहा सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र मोठे असल्याने पर्यटक धरणाच्या मागील बाजूने पाण्यात उतरत आहेत. त्यामुळे धरणाच्या मागील बाजूने जाणाऱ्या मार्गांवरच पर्यटकांना मज्जाव करण्याबाबत नियोजन आहे. अतिउत्साही पर्यटकांनी पाण्यात प्रवेश करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल. -विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Restrictions on entry into khadakwasla dam reservoir by the water resources department pune print news psg 17 mrj
Show comments