पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अवजड वाहने, खासगी प्रवासी बसच्या शहरातील वाहतुकीवर पोलिसांनी काही निर्बंध घातले आहेत. सकाळी चार तास आणि सायंकाळी चार तास अवजड वाहने, खासगी प्रवासी बसला पिंपरी-चिंचवडमध्ये प्रवेशास मनाई असणार आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी काढले आहेत.

औद्योगिकीकरणामुळे लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहराचा विस्तार देखील वेगाने होत आहे. चाकण, तळेगाव एमआयडीसीमध्ये तसेच तळवडे, हिंजवडी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी कात्रज ते रावेत या राष्ट्रीय महामार्गावरून कामगार ये-जा करीत असतात. त्याव्यतिरिक्त तळेगाव, चाकण तसेच तळवडे, हिंजवडीमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या वाहनांचा अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे शहर परिसरातील अवजड वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
Ganja smuggling near Mohol, Solapur, Ganja,
सोलापूर : मोहोळजवळ गांजाची तस्करी; दोन महिलांसह चौघे अटकेत
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
99 Accused from Nagpur City Tadipaar Assembly Election 2024
निवडणुकीच्या धामधुमीत ९९ आरोपी तडीपार…गेल्या १० वर्षात पहिल्यांंदाच…

हेही वाचा >>>पुणे : पतीच्या अंगावर ओतले उकळते पाणी…’हे’ कारण

त्रिवेणीनगर ते तळवडेगावठाण, तळवडेआयटी पार्क मार्गे त्रिवेणीनगर, परंडवाल-खंडेलवाल चौकामार्ग तळवडे, चिखली गावठाण-डायमंड चौक रामकृष्णहरी चौकाकडे येणा-या तसेच रामकृष्णहरी चौकाकडून आयटीपार्क चौक ते तळवडेगावठाण मार्गे परंडवाल चौकाकडे जाणा-या रस्त्यावर, डायमंड चौक ते कुदळवाडी ब्रीजकडे जाणा-या व कुदळवाडी ब्रीज ते डायमंड चौकाकडे येणा-या रस्त्यावर, कृष्णा,साने चौक,नेवाळेवस्तीतून डावीकडून पिंगळेचौक-सोनवणे वस्ती-ज्योतिबानगर चौका दरम्यान जाणे-येण्याच्या मार्गावर अवजड वाहनांना सकाळी आठ ते अकरा, सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंदी असणार आहे.

भक्ती-शक्ती चौक ते त्रिवेणीनगर चौक, तळवडे रोडकडून भक्ती-शक्ती चौक, त्रिवेणीनगर, दुर्गाचौकाकडून टिळक चौकाकडे, थरमॅक्स चौकाकडून खंडोबामाळ चौकाकडे जाण्यास सकाळी सात ते बारा व सायंकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत प्रवेश बंद असणार आहे. चिखली पोलीस स्टेशन ते शाहूनगर चौक, केएसबी चौकाकडे जाण्यास सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत प्रवेश बंद असणार आहे. संभाजी चौक ते खंडोबामाळ चौकाकडे जाण्यास सकाळी आठ ते बारा, सायंकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत प्रवेश बंद असणार आहे.’

हेही वाचा >>>प्रवास यातना! गळक्या गाड्या, झुरळे अन् अस्वच्छतेने रेल्वे प्रवासी हैराण

चिंचवडमधील रिव्हर व्ह्यू चौकाकडून महावीर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे अवजड वाहतुकीस सकाळी नऊ ते अकरा व सायंकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत प्रवेश बंद असणार आहे. भोसरीतील जायका चहा ते पीएमटी चौक, माईवडेवाले चौक ते बनाचा ओढा, नाशिकफाटा चौक ते हॅरीष ब्रिज दरम्यान अवजड वाहने, खासगी प्रवासी बसला सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत प्रवेश बंद असणार आहे.

वाकड पुलाववरुन व वाकड नाका येथून इंडीयन ऑईल चौकाकडे जाण्यास सकाळी आठ ते बारा, सायंकाळी पाच ते रात्री नऊ आणि मुबई-बंगळुरू महामार्गावरुन मायकार शोरुम येथून डावीकडे वळून हिंजवडीकडे जाण्यास सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी पाच ते नऊ पर्यंत प्रवेश बंद असणार आहे. सांगवीतील राजीव गांधी पूल -रक्षक चौक मार्गे काळेवाडी फाटा उड्डाणपुल, रक्षक चौक मार्गे राजीव गांधी पूल, काळेवाडी फाटा ते तापकीर चौक मार्गे एम. एम. चौक, एम्पायर ईस्टेट या दरम्यान, कस्पटे चौक ते सांगवी वाहतूक विभाग हद्दीतील सावित्रीबाई फुले चौक मार्गे शिवार, कोकणे, म्हसोबा चौक नाशिक फाटाकडे जाणा-या व येणाऱ्या रस्त्यावर सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत जड वाहने, खासगी प्रवासी बसला तर म्हसोबा चौक मार्गे पिंपळे गुरवकडे जाणा-या रस्त्यावर व सांगवी फाट्याकडून सांगवी गावात जाणा-या रस्त्यावर सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत जड वाहने, खासगी प्रवासी बसला बंदी असणार आहे.

वाकडनाका, कस्पटे चौक, बिर्ला रुग्णालय ते भुमकर चौक, जिंजर हॉटेल, मायकार शोरुम, शनिमंदिर, जॅगवार शोरूमकडून येथून सेवा रस्त्याने भुमकर चौकाकडे, वाकडगाव चौकाकडून दत्तमंदिर रोड वाकडकडे येण्यास, तापकीर चौक ते थेरगाव फाटा येथील थेरगाव मधील रस्त्यावर अवजड वाहनांना सकाळी सात ते अकरा, सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवेशबंदी असणार आहे.

हेही वाचा >>>पुणे, पिंपरी-चिंचवडमधील ९६ आधार केंद्रे बंद; नागरिक हैराण

सूसखिंड ते नांदेगाव मार्गावावर जाणे-येण्यास सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी पाच ते नऊ प्रवेश बंद असणार आहे. पिंपरी चौकाकडून पिंपरी पुलावर आल्यानंतर डावीकडे वळताना व शगुन चौकाकडे सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. भाटनगरवरुन बाजारामध्ये जाताना अवजड वाहनांना सकाळी आठ ते बारा व सायंकाळी पाच ते नऊ पर्यंत प्रवेश बंद आहे. शगुन, साई, आर्य समाज चौक ते कराची चौक, शगुन, डिलक्स चौक काळेवाडी पुलापर…