पिंपरी : महापालिकेच्या विविध विभागांतील ‘ब आणि ‘क’गटातील चार पदांच्या ३५३ जागांचा निकाल बुधवारी रात्री उशिरा महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील ३८८ जागांसाठी राज्यातील २६ शहरातील ९८ केंद्रांवर टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) माध्यमातून २६, २७ आणि २८ मे रोजी परीक्षा झाली. ५५ हजार ८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महापालिकेने ११ पदांच्या ३५ जागांसाठीचा निकाल ७ ऑगस्ट रोजी जाहीर केला होता. मात्र, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लिपिक या चार पदांचा निकाल रखडला होता. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा होऊनही निकाल लावण्यास विलंब होत असल्याने परीक्षार्थींकडून नाराजी व्यक्त केली जात होती.

हेही वाचा : हुश्श!… ‘राष्ट्रवादी’ चिंचवड, भोसरीवरील दावा सोडणार?

११ पदांच्या ३५ जागांसाठी ७ ऑगस्टला निकाल जाहीर झाल्यानंतर चार पदांचा निकाल स्वातंत्र्यदिनापूर्वी लावण्याचा मुहूर्त प्रशासनाने दिला होता. मात्र, हाही मुहूर्त हुकल्याने परीक्षार्थींकडून महापालिका आणि परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीवर मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा महापालिकेच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षार्थीं पालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी दिली.

हेही वाचा :  “शरद पवारांनी दोनदा पंतप्रधान होण्याची संधी घालवली, आता त्यांनी रिटायर्ड…”, सायरस पूनावालांचा सल्ला

पदनाम पदसंख्या

लिपिक २१३
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ७४
कनिष्ठ अभियंता स्थापत्य ४८
कनिष्ठ अभियंता (विद्युत) १८
एकूण ३५३