पुणे : भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना कर्वे रस्त्यावरील रसशाळा चौक परिसरात घडली. राखी पौर्णिमेच्या दिवशी दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सुनील भास्करराव देशमुख (वय ६०, रा. निको गार्डन, विमाननगर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालक सुनील बाबू होले (वय ३५, रा. गल्ली क्रमांक १६, गोखलेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील देशमुख कृषी विभागातून निवृत्त झाले होेते. सोमवारी (१९ ऑगस्ट) ते कामानिमित्त कर्वे रस्त्यावरील नळस्टाॅप चौकाकडे निघाले होते. रसशाळा चौकातून दुपारी साडेबाराच्या सुमारास ते निघाले होते. त्यावेळी दुचाकीस्वार देशमुख यांना डंपरने पाठीमागून धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले.

60 feet road at chinchpada in kalyan east in worse condition
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील ६० फुटी रस्त्याची दुर्दशा; शाळकरी विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
Sanjay Rathod case, girl suicide, High Court,
संजय राठोड प्रकरण : तपासाला आक्षेप नसल्याचा आत्महत्या केलेल्या तरुणीच्या वडिलांचा उच्च न्यायालयात दावा
Thane Suicide youth, highly educated youth thane,
ठाणे : उच्च शिक्षित तरुणाची आत्महत्या
pune satara highway accident marathi news
मुंबई: मुलुंडमध्ये हिट अँड रन, एकाचा मृत्यू
dumper and car accident on solapur road
सोलापूर रस्त्यावर डंपरची मोटारीला धडक; पिता-पुत्राचा मृत्यू, एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी
Vasind police station, three employees Suspension,
वासिंद पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्याचे निलंबन, तरुणाच्या मृत्यूनंतर ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
leopard attacks in shirur woman dies in leopard attacks in Jambut
शिरुरमध्ये बिबट्यांचे हल्ले; जांबूतमध्ये महिलेचा मृत्यू, कान्हूर मेसाई गावात एकजण जखमी

हेही वाचा >>>‘अजित पवारांच्या मनात नक्की काय माहिती नाही’; बारामतीमधून न लढण्याच्या अजित पवार यांच्या विधानावर शरद पवार यांची प्रतिक्रिया

अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अपघातानंतर पोलीस उपनिरीक्षक भोसले यांनी डंपरचालक भोसले ताब्यात घेतले. त्याला सायंकाळी अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कर्वे रस्त्यावर आणखी एका अधिकाऱ्याचा बळी

दोन महिन्यापूर्वी जलसंपदा विभागातील निवृत्त अधिकाऱ्याचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. जलसंपदा विभागातील निवृत्त अधिकारी सायकलवरुन कर्वे रस्त्याने निघाले होते. त्यावेळी डंपरने त्यांना धडक दिली होती.