पिंपरी: नेपाळ, काशी, अयोध्या येथे यात्रेसाठी नेण्याच्या आमिषाने सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाची दोन लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार मोशीत उघडकीस आला आहे.

भिकन एकनाथ दुसाने (वय ६९, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश बारसू फालक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसाने हे मुंबई पोलीस दलातून उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. फालक याने दुसाने यांना नेपाळ, काशी, अयोध्या येथे यात्रेसाठी नेण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी दुसाने आणि त्यांच्या नातेवाईकांकडून २,०२, ५०० रुपये घेतले. प्रवास सुरू होण्यापूर्वी २० दिवस अगोदर कळविल्यास तिकीट रद्द करून सर्व पैसे परत देतो असे दुसाने यांना सांगण्यात आले. दरम्यान फालक याने दुसाने यांचे रेल्वेचे तिकीट बुक केले नाही. तसेच त्यांनी भरलेले पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

torres fraud mumbai news in marathi
टोरेस गैरव्यवहार प्रकरणः आतापर्यंत ११,३०० गुंतवणूकदारांची १२० कोटींची फसवणूक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
pune cyber crime latest news
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची २५ लाखांची फसवणूक
woman senior citizen , Fraud , fear of action,
कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची साडेदहा लाखांची फसवणूक, ‘डिजिटल ॲरेस्ट’ची धमकी
Fraud, cheap house, government quota,
सरकारी कोट्यातून स्वस्त दरात घरे देण्याच्या नावाखाली सुमारे २५ कोटींची फसवणूक, पुरुषोत्तम चव्हाणसह इतर आरोपीविरोधात गुन्हा
nana patole , reputation , ministers ,
राज्य मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्री कलंकित, पटोलेंचा गंभीर आरोप
Retired teacher and his son got cheated for Rs 30 lakhs Accuseds bail application rejected
निवृत्त शिक्षकासह मुलाची ३० लाखांची फसवणूक; आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर
Black magic fear , women senior citizen cheated,
काळ्या जादूची भीती घालून ज्येष्ठ महिलेची २९ लाखांची फसवणूक
Story img Loader