पुणे: पुणे जिल्हा हा शिक्षणाबाबरोच पर्यटन नगरी म्हणून ओळखला जातो. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असणाऱ्या जीवनधन- नाणेघाट परिसरातला आगळा वेगळा धबधबा बघण्यास मिळतो आहे. ‘रिव्हर्स’ धबधबा हा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाल्याने नाणेघाटातील धबधबा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. रिव्हर्स धबधब्याचे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी अनेकजण त्या ठिकाणी गर्दी करत आहेत.
आणखी वाचा-राज्यात १९ जुलैपासून पावसाचा जोर; हवामान विभागाचा अंदाज
सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यातून वाहणारा ‘रिव्हर्स’ धबधबा हा काही निसर्गाचा चमत्कारच आहे. धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडण्याचं काम हा धबधबा करतो. गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातून अनेक धबधबे ओसंडून वाहत आहेत. त्यापैकीच एक रिव्हर्स धबधबा हा पर्यटकांची ओळख बनला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हा धबधबा ओसंडून वाहत आहे. उंचावरून कोसळणारा धबधब्याच्या पाण्याला सोसाट्याचा वारा पुन्हा वर ढकलतो, यामुळे रिव्हर्स धबधबा निर्माण होतो. याला ‘रिव्हर्स फॉगिंग’ असं देखील म्हटलं जातं. हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून हा धबधबा बघण्यासाठी पर्यटक गर्दी करत असल्याचे चित्र आहे.