दाभोलकर यांची हत्या करणाऱ्या दोन अज्ञात हल्लेखोरांबाबत माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येमागे कोण आहे, याचा पुरेपूर छडा लावण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले असून पुणे क्राइम ब्रँचकडे तपासाची सूत्रे देण्यात आली आहेत. डॉ. दाभोलकर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांची अचूक माहिती देणाऱ्यास पुणे पोलिसांनीही एक लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. पोलिसांनी हल्लेखोरांपैकी एका संशयिताचे रेखाचित्र मंगळवारी सायंकाळी जारी केले आहे. त्यासाठी ९९२३६९५३१५ किंवा ०२०-२६११२२२२ या क्रमांकावर माहिती कळवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Aug 2013 रोजी प्रकाशित
दाभोलकर हत्या : … या क्रमांकावर संशयितांबद्दल माहिती द्या
पोलिसांनी हल्लेखोरांपैकी एका संशयिताचे रेखाचित्र मंगळवारी सायंकाळी जारी केले आहे. त्यासाठी ९९२३६९५३१५ किंवा ०२०-२६११२२२२ या क्रमांकावर माहिती कळवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
First published on: 21-08-2013 at 01:12 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reward of rs 10 lakh to who can provide information on the suspect in the murder dr dabholkar