पुणे : रिक्षाचालकाला दमदाटी करुन सराइत गुन्हेगारांनी रिक्षा चोरुन नेल्याची घटना भवानी पेठेत घडली. या प्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज उर्फ बब्बाली मकबूल खान (वय ४९, रा. भवानी पेठ), इमरान मेमन (वय ५०) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत राजू डेव्हिड (वय ६०, रा. भवानी पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खान आणि मेमन सराई त गुन्हेगार आहे. कारागृहात असलेला खान जामीन मिळवून नुकताच बाहेर आला आहे.

आरोपी आणि रिक्षाचालक डेव्हिड ओळखीचे आहेत. भवान पेठेतील निशात चित्रपटगृहाजवळ रिक्षाचालक डेव्हिड थांबले होते. त्या वेळी आरोपी खान आणि मेमन तेथे आले. डेव्हिड यांना दमदाटी करुन आरोपी रिक्षा घेऊन पसार झाले. डेव्हिड यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.

Two arrested for stealing a vehicle in Pimpri
पिंपरी: वाहन चोरी करणारे दोघे अटकेत; आठ दुचाकी जप्त
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
drug, Nagpur , drug addiction, narcotics ,
नागपूर शहर बनले नशाखोरीचे केंद्र, वर्षभरात ३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
bike thieves arrested loksatta news
कल्याण, नवी मुंबई, डोंबिवलीत मोटार सायकल चोरणारे उल्हासनगरमधून अटक
Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
Gang involved in gold chain and vehicle theft arrested
सोनसाखळी, वाहनचोरी करणारी टोळी उघडकीस; सराईत अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
nylon manjha, Kite festival
नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी, पतंग महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हा
Two rickshaws collided after minor driver lost control of tempo
अल्पवयीन चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने दोन रिक्षांना धडक
Story img Loader