रस्त्यावर थुंकल्यामुळे होणारे आजार व अस्वच्छता, या विषयी जनजागृती करण्यासाठी रिक्षांच्या हूडवर विविध संदेश देणारी भित्तिपत्रके लावण्याची मोहीम रविवारी िपपरीत सुरू करण्यात आली.
िपपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या या कार्यक्रमात महापौर शकुंतला धराडे, आयुक्त राजीव जाधव, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे यांच्या हस्ते रिक्षांना भित्तिपत्रके लावण्यात आली. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे बाबा कांबळे, दिलीप साळवे, साहेबराव काजळे, महादेव थोरात आदी उपस्थित होते. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. स्वच्छतेसाठी सहकार्य करणाऱ्या रिक्षाचालकांचा सत्कार करण्यात आला.

Story img Loader