दुचाकी टॅक्सीच्या विरोधात शहरात सोमवारी (१२ डिसेंबर) पुन्हा रिक्षा बंद करण्यात येणार आहे. बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समितीकडून हा बंद पुकारण्यात आला आहे.शहरात सुरू असलेल्या दुचाकी टॅक्सीच्या विरोधात रिक्षा संघटनांनी २८ नोव्हेंबरला बंद पुकारला होता. त्या वेळी मोठ्या संख्येने रिक्षाचालक बंदमध्ये सहभागी झाले होते. प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोठा मार्चा काढण्यात आला होता. मात्र, प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यामुळे बंद स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर बंदमधील काही रिक्षा संघटनांमध्ये वाद निर्माण झाले होते. त्यामुळे समितीत फूट पडल्याचेही दिसून आले.
हेही वाचा >>>पुणे: तापमानात वाढ, पावसाची हजेरी; आणखी दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता
बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समितीकडून पुन्हा रिक्षा बंद पुकारण्यात आला आहे. आमच्या मागण्यांबाबत कोणताही तोडगा काढला नाही. केवळ कागदी घोडे नाचविण्यात आले आहेत. त्यामुळे बंद पुकारण्यात येणार असल्याचे समितीचे डॉ. केशव क्षीरसागर यांनी कळविले आहे.