पुणे : आंबेगाव, पवनानगर, तसेच भाजे धबधबा परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या सात पर्यटकांविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला.भुशी धरण परिसरातील धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली. या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ अन्वये सात पर्यटकांविरुद्ध कारवाई करण्यात आली, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धोकादायक पद्धतीने पर्यटन करणाऱ्या पर्यटकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. याबाबत पर्यटकांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची नजर चुकवून पर्यटक धबधब्याच्या परिसरात जाऊन अपघातास निमंत्रण देत आहेत. आंबेगाव येथील डोंगररांगात असलेल्या धबधब्यावर २१ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास पोलिसांची नजर चुकवून गेलेल्या पाच पर्यटकांवर कारवाई करण्यात आली. भाजे लेणी परिसरातील धबधब्याच्या बाजूला गेलेल्या दोन पर्यटकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत धोकादायक पद्धतीने पर्यटन करणाऱ्या १५ पर्यटकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

हेही वाचा >>>पिंपरी : चऱ्होलीत नवीन आयटी पार्क; किती जणांना मिळणार रोजगार?

लोणावळा शहर, तसेच ग्रामीण भागात पुणे, मुंबईतील पर्यटक मोठ्या संख्येने वर्षाविहारासाठी येतात. पर्यटकांनी आनंद घ्यावा. मात्र, पर्यटन करताना जिवाला धोका होईल, असे कृत्य करू नये. याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच पर्यटनस्थळांवर फलक लावण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करणाऱ्या पर्यटकांविरुद्ध यापुढील काळात कारवाई करण्यात येणार आहे.- किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे</p>

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rioting in the waterfall area in lonavala crime against seven tourists pune print news rbk 25 amy
Show comments