पुणे : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवडाभरात युद्धाच्या कथा असलेल्या पुस्तकांना पुणेकरांकडून पसंती मिळत असून या विषयावरील पुस्तकांच्या खपामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू झाल्याचा परिणाम वाचकांच्या आवडनिवडीवर दिसून आला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याच्या उद्देशातून ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर लिखित ‘पुतीन’ या पुस्तकाला सर्वाधिक मागणी राहिली. त्याचबरोबरीने युद्धविषयक पुस्तकांची खरेदी करण्याकडे वाचकांचा कल होता. पुतीन या पुस्तकाच्या आठवडय़ात शंभराहून अधिक प्रतींची विक्री झाली असून सातवी आवृत्ती संपली आहे. नव्या आवृत्तीसाठी ५० वाचकांनी आगाऊ नोंदणी केली आहे, अशी माहिती अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठिवडेकर यांनी दिली.
अतुल कहाते यांचे ‘युद्धखोर अमेरिका’, निरंजन घाटे यांचे ‘युद्धकथा’, अनंत भावे यांचे ‘युद्धकथा’, स. शं. देसाई लिखित ‘पहिले जागतिक महायुद्ध’ आणि ‘दुसरे जागतिक महायुद्ध’, वि. स. वाळिंबे यांचे ‘दुसरे महायुद्ध’ या पुस्तकांची खरेदी केली जात आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू झाल्यापासून युद्धविषयक पुस्तकांची मागणी वाढली आहे. त्यामध्ये ‘पुतीन’ या पुस्तकाच्या सर्वाधिक प्रतीची विक्री झाली असून वाचक या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीची प्रतीक्षा करत आहेत.
– शैलेश नांदुरकर,
संचालक, रसिक साहित्य