पुणे: शहरातील रस्त्यांची चाळण झाल्यानंतर खड्डे दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतला असला तरी, ऐन पावसाळ्यात केलेली अशास्त्रीय पद्धतीच्या दुरुस्तीमुळे बुजविण्यात आलेल्या खड्ड्यांमधील बारीक खडी रस्त्यावर पसरण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांतच पुन्हा रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे खड्डे दुरुस्ती जीवघेणी ठरण्याची शक्यता निर्माण झाली असून खड्डे दुरुस्तीसाठी केलेला लाखो रुपयांचा खर्चही पाण्यात गेला आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपर्यंत सुरू असलेल्या जोरदार पावसाने रस्त्यांची दुरवस्था होऊन रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे ऐन पावसाळ्यातच महापालिकेच्या पथ विभागाकडून खड्डे दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. खड्डे बुजविण्याचे काम रात्रीही चालू ठेवत अनेक लहान मोठे खड्डे भरण्यात आले. मात्र या खड्डे दुरुस्ती तात्पुरती मलमपट्टी ठरल्याचे पुढे आले आहे.खड्डे दुरुस्ती करताना बारीक खडीचा वापर करण्यात आला आहे. मात्र घाईगडबडीत आणि अशास्त्रीय पद्धतीने खड्डे दुरुस्ती करण्यात आल्याने खडी रस्त्यावर येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे.

emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Image Of Kannauj Building Collapse
Kannauj Building Collapse : उत्तर प्रदेशात रेल्वे स्थानकावर बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘पुण्यात ७ दुकानं, १५ कोटींचा संपूर्ण मजला…’, आमदार सुरेश धसांचा ‘आका’कडील संपत्तीबाबत मोठा दावा
वाकडमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा; १३७ शेड, १८ घरे जमीनदोस्त
Old Bhandara road, Nagpur , Old Bhandara road news,
रस्ते, उड्डाणपुलांमुळे प्रसिद्ध नागपुरात एक रस्ता असाही आहे जो २५ वर्षापासून…
Maharashtra ST Bus Service
एसटीच्या इलेक्ट्रिक बस तोट्यात, सरासरी एका किलोमीटर मागे…
traffic jam Katai Karjat State Highway Khoni Nevali village
Video : काटई कर्जत राज्यमार्गावर मोठी वाहतूक कोंडी; नोकरदार, दूर पल्ल्याचे प्रवासी अडकले

हेही वाचा >>>आरटीई प्रवेशांची मुदत संपली…जागा राहिल्या रिक्त… आता पुढे काय होणार?

इंडियन रोड काँग्रेसच्या निकषानुसार खड्डे दुरुस्ती होणे आवश्यक आहे. मात्र या निकषाकडे दुर्लक्ष करत हाॅटमिक्स, कोल्डमिक्स, पेवर ब्लाॅकच्या माध्यमातून रस्ते दुरुस्ती केली जात आहे. काही रस्त्यांवरील खड्डे पेवर ब्लाॅक टाकून बुजविण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्याचा पृष्ठभाग असमोतल झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून काही रस्त्यांवर ‘पॅचवर्क’ची कामेही तकलादू ठरली आहेत. त्यामुळे सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची पुन्हा दुरुवस्था होण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा >>>Pune crime news: सायबर चोरट्यांकडून सहा जणांची ८० लाखांची फसवणूक

पावसाने उघडीप न घेतल्याने रस्ते दुरुस्तीच्या कामाला मर्यादा येत होत्या. गेल्या शनिवारपासून रात्री खड्डे बुजविण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्यावर करायचे ‘पॅचवर्क’ या दोन्ही कामांवर महापालिकेच्या पथ विभागाकडून लक्ष केंद्रित करण्यात आले. सिमेंटचा वापर करून खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली असून, ‘पॅचवर्क’साठीही सिमेंटचा वापर करण्यात येत आहे. तसेच अनेक खड्डे आणि ‘पॅचवर्क’ डांबरी मालाच्या साहाय्याने बुजविण्यात येणार आहेत. मात्र ही कामे गुणवत्तापूर्ण न झाल्यास रस्त्यांची दुरवस्था कायम राहणार आहे.

दरम्यान, इंडियन रोड काँग्रेसच्या निकषानुसार खड्डे दुरुस्ती करणे शक्य होणार नाही. निकषानुसार रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागणार असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळत रस्ते दुरुस्तीची काम केली जात आहेत, असा दावाही पथ विभागाकडून करण्यात आला आहे.

Story img Loader