पुणे : मी सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून कार्यरत होतो. त्यानंतर विविध नेत्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. तेव्हापासून एवढय़ा मोठय़ा प्रमाणात भरती झालेली मी पाहिलेली नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी आमच्या सरकारने दीड लाख तरुण-तरुणींना रोजगार देण्यासाठी नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधक जाणीवपूर्वक कंत्राटी भरतीचा बागुलबुवा उभा करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले.

पुणे दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कंत्राटी भरतीबाबत सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. कंत्राटी भरतीबाबत कोणाच्या कार्यकाळात कोणता निर्णय झाला, याचे त्यांनी दाखले दिले आहेत. हा निर्णय ज्यांच्या कार्यकाळात झाला, तेव्हा याचा आताएवढा बभ्रा झाला नव्हता. जाणीवपूर्वक विरोधकांनी कंत्राटी भरतीचा बागुलबुवा उभा केला आहे.

Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Ajit Pawar clarification on the Beed case pune news
पक्ष न पाहता दोषींना कठोर शिक्षा; बीड प्रकरणी अजित पवार यांची स्पष्टोक्ती
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
शरद पवारांनी संघाचे कौतुक करताच अजित पवारांच्या ‘या’ आमदाराने व्यक्त केली खंत, म्हणाले…
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
ajit pawar sharad pawar (7)
Sharad Pawar NCP: सुप्रिया सुळे वगळता शरद पवार गटाच्या ७ खासदारांना होती अजित पवार गटाकडून ‘ऑफर’, पडद्यामागे घडतंय काय?
ajit pawar group on suresh dhas
Suraj Chavan: “..तेव्हा गृहखातं झोपा काढत होतं काय?”, सुरेश धसांच्या विधानानंतर अजित पवार गटाच्या नेत्याची टीका

हेही वाचा >>>पूर्वप्राथमिक शिक्षणासाठीचा राज्य अभ्यासक्रम आराखडा प्रसिद्ध

वास्तविक आताच्या आमच्या सरकारने दीड लाख नोकरभरतीचा निर्णय झाला आहे. मध्यंतरी आर. आर. पाटील यांच्या काळात ६० किंवा ६५ हजारांची भरती लागोपाठ पाच वर्षांची झाली होती. टाटा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या (एमपीएससी) संस्थांना भरतीची जबाबदारी दिली आहे. युवा पिढीत विशेषत: बेरोजगार तरुणांमध्ये गैरसमज पसरवण्यात आला, की तुमच्या नोकऱ्या काढून घेतल्या जात आहेत आणि कंत्राटी भरती सुरू आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय पुढे आला, तेव्हा फडणवीस स्वत: म्हणाले, मी पत्रकार परिषद

घेतो आणि वस्तुस्थिती लोकांसमोर मांडतो. कोणी माफी मागायची हेदेखील लोकांसमोर आणतो, त्यानुसार त्यांनी पत्रकार परिषद घेतली, असेही पवार म्हणाले.

Story img Loader