पुणे महापालिकेचे त्या वेळचे आयुक्त स. गो. बर्वे यांनी १९५२मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत, लक्ष्मी रस्त्याच्या रूंदीकरणाचा प्रस्ताव मांडला होता. त्याही वेळी हा रस्ता वाहतुकीला अपुरा पडत होता आणि नंतरच्या काळात निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता, वेळीच तो रूंद करणे आवश्यक आहे, याबद्दलची दूरदृष्टी बर्वे यांच्यापाशी होती. पण त्या वेळी आयुक्तांच्या ठरावास विरोध करण्यात आला. कशाला हवाय लक्ष्मी रस्ता रूंद? काय रणगाडे न्यायचेत काय त्या रस्त्यावरून? अशी वक्तव्ये करून त्या वेळच्या नगरसेवकांनी आपण किती अदूरदृष्टीचे आहोत, हे सिद्ध केले. हा रस्ता रूंद झालाच असता, तर त्याच वेळी. नंतरच्या काळात ते होणे शक्य नाही, असे सांगत प्रत्येक वेळी तो आहे तसाच ठेवण्यात नगरसेवकांनी धन्यता मानली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in