पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर भागात कुणाल आयकॉन रस्ता (रोड) खचल्याची घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. रस्त्यालगत इमारतीचे बांधकाम सुरू असून मोठा खड्डा करण्यात आला आहे. त्या लगतच असलेला रस्ता खचल्याचा एक व्हिडीओ समोर आला. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळेच शहरातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर भागात रस्ता खचल्याची घटना समोर आली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास अचानक रस्ता खचल्याने बांधकाम सुरू असलेल्या खड्ड्यात माती कोसळली. सकाळी स्कूल बस आणि नोकरीवर जाणारे नागरिक याच कुणाल आयकॉन रस्त्यावरून जातात. परंतु, ऐनवेळी रस्ता खचल्याचे लक्षात आल्याने सुरक्षिततेविषयी काळजी घेण्यात आली. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.

हेही वाचा – पुण्यात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात तूर्त कायम

हेही वाचा – पुण्यात खड्डेच खड्डे चोहीकडे!

महानगरपालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. यावेळी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना उर्फ विठ्ठल काटे आणि भाजपाचे माजी नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road collapsed at pimpale saudagar an upscale area of pimpri chinchwad city no casualties kjp 91 ssb