प्रादेशिक परिवहन विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात रस्ते सुरक्षा कक्षाची स्थापना करण्यात आली. याच कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकावू परवाना दिला जाणार असून, असा कक्ष सुरू झालेले फर्ग्युसन हे राज्यातील पहिलेच महाविद्यालय ठरले आहे. रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत पुणे प्रादेशिक परिवहन विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात बुधवारी झालेल्या कार्यक्रमात कक्षाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या हस्ते झाले. डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. संजीव भोर, डॉ. राजेंद्र शर्मा, वेस्टर्न इंडिया ऑटोमोटिव्ह असोसिएशनच्या सिमरन  आदी या वेळी उपस्थित होते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे : मिळकतकरातील चाळीस टक्के सवलतीबाबत आज मुंबईत बैठक

वाडकर म्हणाले, सर्वांनीच वाहन चालवताना नियम पाळले पाहिजेत. छोट्या चुकांमुळे अपघात होतात. अपघातात तरूण मुलगा-मुलगी गमावल्यावर पालकांचे विश्व हादरते. सीटबेल्ट, हेल्मेटचा वापर न चुकता केला पाहिजे. महाविद्यालयात पहिल्यांदाच रस्ता सुरक्षा कक्ष सुरू करण्यात आला आहे. येत्या काळात राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये असे कक्ष सुरू केले जातील. रस्ते सुरक्षेसंदर्भात काम करण्यासाठी महाविद्यालयात स्वतंत्र समिती असायला हवी. ऑनलाइन पद्धतीने वाहन चालवण्याचा परवाना देत असताना वाहन चालकाकडून नियमांचे पालन अपेक्षित आहे. वाहन चालन परवाना मिळवणे सोपे झाले असले, तरी त्यासाठीची चाचणी अवघड करण्यात आली आहे. वाहन चालवण्याचा परवाना वाहन चालवण्यासाठी आहे, इतरांना धोक्यात आणण्यासाठी नाही. भारतात लोक वाहन चालवण्याचे कौशल्य दाखवायला जातात आणि अपघात होतात. परदेशात नियम पाळले जात असल्याने अपघातांचे प्रमाण कमी आहे, असे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुणे : हडपसरमध्ये मैत्रिणींची आत्महत्या ; एकीने गळफास घेतला, दुसरीची इमारतीतून उडी

तरुणांकडून वाहनांचा वापर वाढत असल्याने त्यांच्यात रस्ते सुरक्षेविषयी जागृतीची आवश्यकता आहे. त्यामुळे १८ वर्षे पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना पालकांकडून वाहन दिले जाते. मात्र वाहन चालवताना भान राखले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी महाविद्यालय हेच योग्य ठिकाण आहे. या कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकावू परवाना देतानाच रस्ते सुरक्षेविषयी जागृती होईल, असे डॉ. परदेशी यांनी नमूद केले.