पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी जोरदार पाऊस झाला. दुपारी तीनच्या सुमारास सुरू झालेला मुसळधार पाऊस सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत पडत होता. त्यामुळे विविध भागांतील रस्ते जलमय झाले होते. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. शहरात शुक्रवारी सायंकाळी पावसाचा जोर वाढला होता. परंतु, तासाभरात पाऊस उघडला. शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी तीनच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला.

हेही वाचा >>> राज्यात बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
water pipe bursts in Dombivli
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते काम करताना जलवाहिनी फुटली;  पी. पी. चेंबर्सजवळ शेकडो लीटर पाणी वाया
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
Panvel Municipal Commissioner decision to build infectious disease hospital in Kalamboli
कळंबोलीत साथरोग रुग्णालय; पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय, २७ कोटींचा खर्च अपेक्षित
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
Kandalwan damage new jetty, Virar Marambalpada,
नवीन जेट्टीच्या रस्त्यासाठी तिवरांची कत्तल? विरारच्या मारंबळपाडा परिसरातील प्रकार; पर्यावरणप्रेमींकडून संताप
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत

पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, निगडी, वाकड, सांगवी, पिंपळे निलख असा शहराच्या सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. सायंकाळी साडेसहापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला, तरी रिमझिम सुरूच होती. मुसळधार पावसामुळे चोहीकडे पाणीच पाणी झाले. रस्ते जलमय झाले. आकुर्डीसह काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांत पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले होते. समतल विलगकामध्ये मोरवाडी, कासारवाडी, कुंदननगर भागात पाणी साचल्याने त्याचा फटका वाहतुकीला बसला. वाहतूक संथ झाली होती. पिंपरी ते चिंचवड रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या. महापालिका यंत्रणा सतर्क असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी सांगितले.

Story img Loader