पुण्यात खंडणी विरोधी पथकाने दरोडेखोरांचा पाठलाग करून त्यांना गाठलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी पिस्तूल रोखून त्यांना मोटारीच्या खाली उतरण्यास सांगितले, पण दरोडेखोरांनी पोलिसांवर चाकूने हल्ला केला. यावेळी दोन अज्ञात दरोडेखोर पसार झाले आहेत. हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. ही घटना अगदी फिल्मी स्टाईल वाटते पण हे प्रत्यक्षात घडली आहे. शुक्रवारी (३ जून) मध्यरात्री दीडच्या सुमारास पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर हा थरार पाहायला मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेत प्रदीप गुट्टे, निशांत काळे हे दोघे जखमी झाले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांनी दिली. दोन्ही जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी भेट घेऊन त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं. आयुक्तांनी घटनास्थळी देखील पाहणी केली आणि अज्ञात आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आदेश दिले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, प्रदीप गुट्टे, निशांत काळे हे रात्री गस्तीवर होते. चिखली परिसर पाहून देहूरोड, तळेगावच्या दिशेने ते जात होते. तेव्हा, एका व्यक्तीने पोलिसांची गाडी थांबवून आमची चारचाकी गाडी चोरी गेली आहे असं सांगितलं. तात्काळ अजय जोगदंड यांनी नियंत्रण कक्षाला माहिती देत देहूरोड, सोमटणे फाटा (टोल नाका) येथे नाकाबंदी करण्यास सांगितली. त्याच वेळी संबंधित व्यक्तीने सांगितलेली चारचाकी गाडी टोलनाका येथे दिसली, अशी माहिती अजय जोगदंड यांना मिळाली.

हेही वाचा : कल्याणमध्ये एक हजार रुपयांमुळे वाद, गॅरेज मेकॅनिकवर जीवघेणा हल्ला; मुख्य आरोपीस अटक, दोघे फरार

तात्काळ तिथं जाऊन टोलनाका फाडण्याच्या अगोदर त्यांना घेराव घालण्यात आला. त्यांना बाहेर येण्यास सांगितलं, परंतु ते येत नव्हते. अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांनी त्यांच्यावर पिस्तुल रोखलं, गाडीची बनावट चावी काढून घेतली. परंतु, पोलीस काही करण्याच्या आत त्यांनी पोलिसांवर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि डोंगराच्या दिशेने पसार झाले. पोलिसांनी त्या दोन दरोडेखोरांचा शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. त्यांनी चोरी केलेल्या मोटारीत घातक शस्त्र मिळून आली आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robber attack on police two injured in pune kjp pbs
Show comments